Pune Crime : बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून महिलांची फसवणूक; आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
Fake Gold Biscuits

Fake Gold Biscuits

sakal

Updated on

पुणे - बनावट सोन्याची बिस्किटे दाखवून ज्येष्ठ महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आरोपीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मूळचा लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील असून, त्याच्याविरुद्ध पुण्यासह लातूर, कराड शहरातील पोलिस ठाण्यांत अपहरण, अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com