
शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात न्यायाधीशांच्या आदेशाची खोटी ऑर्डर सादर करत एका प्रकरणातील आरोपींनी जामीन मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साम टिव्हीच्या वृत्तानुसार न्यायाधीशांची सही असलेली एक खोटी ऑर्डर जोडून फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपींनी चक्क मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचे समोर आले आहे.