FDA Crime : हृदयविकार, रक्तदाबासह मधुमेहावरील बनावट औषधे; इंडयूकेअर फार्मास्युटिकलचा परवाना रद्‌द

हृदयविकार, रक्तदाबासह मधुमेहासह इतर गंभीर आजार बरे करणारे कोणतेही सक्रिय घटक नसलेली म्‍हणजेच बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपनीचा औषध उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केला रद्‌द.
fda crime on medicine

fda crime on medicine

sakal

Updated on: 

पुणे - हृदयविकार, रक्तदाबासह मधुमेहासह इतर गंभीर आजार बरे करणारे कोणतेही सक्रिय घटक नसलेली म्‍हणजेच बनावट औषधे तयार करणाऱ्या जेजुरीतील इंडयूकेअर फार्मास्युटिकल अँड रिसर्च फाउंडेशन या कंपनीचा औषध उत्पादन परवाना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रद्‌द केला आहे. याच कंपनीने पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात औषधांचा पुरवठा केला होता. म्‍हणजेच यावरून रुग्‍णांना गोळ्यांच्या स्‍वरूपात औषधी घटक नसलेले पावडर व औषधांच्‍या नावाखाली ‘लिक्विड’ देण्‍यात आल्‍याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Loading content, please wait...