
पुणे : मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील यांच्या वाहनावर खासगी चालक असलेल्या व्यक्तीने सरकारी गणवेशात व सरकारी वाहनांचा गैरवापर करीत वाहनचालकांकडून बेकायदा वसुली केली. त्याचा वसुली करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतरदेखील परिवहन विभागाने संबंधित मोटार वाहन निरीक्षकावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सोमवारी (ता. ७) या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाईबाबतचा निर्णय होईल, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले.