
खेड शिवापूर : ‘गोशाळा व्यवसायात मोठा परतावा मिळेल’ असे आमिष दाखवून कथित आध्यात्मिक गुरू सचिन बाळासाहेब सापळे ऊर्फ मामा महाराज (रा. हुबळी, कर्नाटक) याने काही भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.