
उरुळी कांचन : सुनेविरोधात कोर्टातून सोडचिठ्ठी मिळवून देण्याचे आमिष दाखवून वयोवृद्ध शेतकऱ्याकडून सुमारे ६ लाख रुपये लुटणाऱ्या बोगस महिला वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कडु बाबुराव सातपुते (वय. ६३, रा. दहिगाव माळी गल्ली, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.