कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्राण गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना पुणे पोलिसांकडून आधार 

The families of the policemen who lost their lives due to Corona are getting support from the Pune police force
The families of the policemen who lost their lives due to Corona are getting support from the Pune police force

पुणे :  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलिस म्हणून कर्तव्य बजावताना कुटुंबातील घरातील कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाला. अशावेळी त्या घटनेतून सावरण्यापासून संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसविणे पोलिसांच्या कुटुंबांना अवघड होते. मात्र पुणे पोलिस दलाकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50-60 लाखांची मदत मिळवून देण्याबरोबरच या कुटुंबांना सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांचे आरोग्यापासून नोकरी मिळवून देण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्न करत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्‍टरांप्रमाणेच राज्यातील पोलिस प्रशासनाकडूनही भरपूर प्रयत्न केले जात होते. नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवतानाच पुण्यासह राज्यातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला. राज्यातील दोनशेहून अधिक पोलिसांना प्राण गमवावे लागले.दरम्यान, कुटुंबप्रमुखच कोरोनाने हिरावून घेतल्यामुळे पोलिसांची कुटुंबे देखील चिंतेत होती. परंतु राज्य सरकारच्या गृह विभागाकडून त्यांना आर्थिक मदत करतानाच खंबीरपणे उभे करण्यावर भर देण्यात आला. 

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

पुणे पोलिस दलामध्ये आत्तापर्यंत अकराशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातून बहुतांश पोलिसांनी कोरोनावर मात केली. त्यापैकी सध्या दोनशे जणांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने कोरोनाविरुद्ध लढताना पाच पोलिसांना आपल्या प्राणास मुकावे लागले. आधारवड कोसळलेल्या या कुटुंबांकडे लक्ष देण्यावर पुणे पोलिसांनी भर दिला. पोलिसांच्या स्वतंत्र पथकामार्फत संबंधित कुटुंबांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. एक ते दीड महिन्यात कुटुंबांना 50 ते 60 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. त्यामुळे काही कुटुंबांना 60 लाख रुपयांची मदत मिळू शकली, तर काही जणांच्या सानुग्रह अनुदानाचे काम प्रक्रियेत आहे. अंत्यविधी खर्च, कुटुंबांच्या क्वारंटाईनचा खर्चही मिळवून देण्यात आले आहे. 

आर्थिक मदत मिळवून देतानाच पुणे पोलिस प्रशासनाकडून, त्या-त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधित कुटुंबांची काळजी घेण्यावर भर दिला जात आहे. फोनद्वारे संपर्क ठेवून विचारपूस करणे, कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करून त्यांना आधार देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. 
 
"माझे बंधू पोलिस कर्मचारी दीपक सावंत हे समर्थ वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी संपर्कात राहून सानुग्रह अनुदान मिळवून दिले. भावाची मुले लहान आहेत. मात्र भविष्यात कुटुंबातील सदस्याला नोकरीत समाविष्ट करण्याबाबतही आम्हाला विचारणा करण्यात आली.''
- विनोद सावंत. नागपूर चाळ. 

"माझ्या वडील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश दळवी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे पोलिस सातत्याने संपर्कात होते. त्यांनी आवश्‍यक कागदपत्रे घेऊन सानुग्रह अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच वेळोवेळी फोन करून मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.''
- अभिजित दळवी, वारजे. 

 जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

"पोलिसांचे एक स्वतंत्र पथक कोरोनाबाधीत पोलिसांशी संवाद साधते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करणे, कुटुंबीय व डॉक्‍टरांच्या संपर्कात राहून उपचारासाठी आवश्‍यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले जाते. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आमच्या पाच पोलिसांना प्राण गमवावा लागला. मात्र त्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदासानपासून सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.''
- डॉ.रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com