पुणे - कौटुंबिक वादात पत्नी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी मागत असल्याचे अनेक प्रकरणांत घडले आहे. मात्र येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल असलेल्या घटस्फोटाच्या एका प्रकरणात पत्नीने स्वतःसाठी काही न मागता आपल्या मुलाच्या भविष्यासाठी पतीकडे न्यायालयात मदतीचा हात मागितला. त्यावर पित्याने मुलासाठी सकारात्मक विचार करत ३० लाख रुपयांची पोटगी दिली.