

Violent Clash in Uruli Kanchan Over Land Sale Proceeds Leaves Couple Injured
esakal
-सुनील जगताप
उरुळी कांचन : वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या देवाण घेवाणीवरून पती-पत्नीला त्यांच्याच पुतण्यांनी, भावाने व बहिणीने मिळून बेदम मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बगाडे वस्ती येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादीचा भाऊ,दोन पुतणे,बहिण व नातेवाईक अशा सहा जणांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.