family planning
sakal
पुणे - कुटुंब नियोजन उपायांचा स्वीकार समाजात झपाट्याने वाढत असून, गेल्या तीन ते चार वर्षांत कुटुंब नियोजनासाठी ‘अंतरा इंजेक्शन’, ‘छाया’ या गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी सातत्याने वाढल्याचे महापालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर पुरुष नसबंदीचेही प्रमाण कमी असले तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेतदेखील वाढत आहे.