Dog Festival : 'फर फियेस्टा' श्वान महोत्सवात श्वानांची जिंकली पुणेकरांची मने

पुण्यामध्ये श्वान आणि त्यांना प्रेमाने पाळणाऱ्या पालकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन श्वान महोत्सवाचे आयोजन पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 'फर फियेस्टा' या नावाने करण्यात आले होते.
far fiasta dog festival
far fiasta dog festivalsakal
Summary

पुण्यामध्ये श्वान आणि त्यांना प्रेमाने पाळणाऱ्या पालकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन श्वान महोत्सवाचे आयोजन पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 'फर फियेस्टा' या नावाने करण्यात आले होते.

वडगाव शेरी - अमली पदार्थ, स्फोटक पदार्थ शोधून देणारे, पोहोणारे, साहसी खेळ खेळणारे इथपासून ते अगदी योगासन करणारे हुशार श्वान आपण पाहिलेत का? तसेच अगदी सहा इंचापासून तर कमरे इतक्या उंचीचे आणि भारतात अगदी कमी ठिकाणी आढळणारे श्वान. पाहाता क्षणी कुरवाळण्याची इच्छा व्हावी असे 'क्युट' ते छातीत धडकी भरेल असे आक्रमक श्वान एकाच छताखाली आपणास पाहता आणि अनुभवता आले तर. हा सर्व अनुभव प्राणी प्रेमी पुणेकरांनी नुकताच घेतला.

पुण्यामध्ये श्वान आणि त्यांना प्रेमाने पाळणाऱ्या पालकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन श्वान महोत्सवाचे आयोजन पुण्यातील कोरेगाव पार्क येथे 'फर फियेस्टा' या नावाने करण्यात आले होते. या महोत्सवात शेकडो श्वानांनी भाग घेतला. फर क्रिव्ह संस्थेचे संस्थापक जगदीश राव आणि इव्हेंट स्पेशल संस्थेचे फ्रान्सिस कोयलो यांनी या दोन दिवासीय (ता 11 आणि 12) महोत्सवाचे आयोजन केले होते.

far fiasta dog festival
Water Supply Scheme : समान पाणी पुरवठा योजनेचे वर्षात केवळ १५ टक्के काम

पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या श्वानांनी स्फोटक पदार्थ शोधणे, अमली पदार्थ शोधणे असे विविध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या प्रात्यक्षिकांमध्ये टायसन, राधा, रिद्धी, सिद्धी, ऑस्कर, लॅब, जॅक या श्वानांनी भाग घेतला.

तर पुणेकर असलेले राजू परदेशी आणि पूर्वा परदेशी यांच्या रशियन समोईड जातीचा श्वानाने सर्वांचे आकर्षण ठरला. आयोजक जगदीश राव यांनी पाळलेला सैबेरियन हस्की जातीचा आणि दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगाचे असलेला श्वान लक्षवेधी ठरला.

पुणेकर अबाल वृद्धांनी या श्वान महोत्सवाचा आनंद लुटला. श्वानांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि बक्षिसे मिळवली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या श्वान प्रशिक्षक आणि श्वान वर्तवणूक तज्ञ शिरीन धाभर यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव झाला.

अशा प्रकारच्या महोत्सवातून आपल्याला आनंद, हास्य आणि प्राण्यांविषयी अधिकची माहिती मिळते. सुमारे 100 प्रजातीचे शेकडो श्वान या महोत्सवात सहभागी झाले, असे फ्रान्सिस कोयलो यांनी सांगितले.

far fiasta dog festival
Pune Crime : एनआयएचे पुण्यासह मध्यप्रदेशात छापे

आपण सर्व प्रकारचे महोत्सव साजरे करतो तसाच हा श्वान महोत्सव. या महोत्सवात श्वान आणि त्यांचे पालक यांकरता विविध आनंददायी तसेच श्वानांविषयी महत्त्वाची माहिती देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सर्व प्राणी प्रेमी व्यक्ती, संस्था आणि सेवा देणारे एकत्र आले.

- जगदीश राव (संस्थापक - फर क्रिव्ह)

श्वान महोत्सव पुण्यात नेहमी व्हावेत. आम्ही सहकुटुंब या महोत्सवात सहभागी झालो. दोन दिवस आमचा श्वान आणि आम्ही खूप आनंद लुटला.

- पूर्वा परदेशी (श्वान प्रेमी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com