Farmer Questions Man Urinating Near House, Arguments Escalate
सुनील जगताप
थेऊर : घरासमोर लघवी करताना दिसला म्हणून त्याला हाटकल्याचा राग आल्याने एका परप्रांतीय शिक्षकाने शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केली असल्याची घटना २८ नोव्हेंबरला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत थेऊर फाटा येथे घडली. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी कांतीलाल काळभोर(वय ४३,रा.कुंजीरवाडी,थेऊरफाटा ता.हवेली)या शेतकऱ्यांने दिलेल्या फिर्यादीवरून आनंद मोहन कुलकर्णी(वय ३८,रा.सुहाग कॉलनी,विजापुर, कर्नाटक)याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.