कोल्हापूरच्या शेतकऱ्यास दगडाने मारहाण; ह. मंगेवाडी येथील दोघांविरुद्ध तक्रार

कोल्हापूरच्या शेतकऱ्यास दगडाने मारहाण; ह. मंगेवाडी येथील दोघांविरुद्ध तक्रार
Published on

उसाच्या कांड्या घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यास मारहाण
कॅनलजवळ वाहन अडवून दगडाने डोक्यात मारले; दोघांविरुद्ध तक्रार
सांगोला, ता. २१ ः उसाच्या कांड्या देऊन पिकअपमधून परत जात असलेल्या शेतकऱ्याला हटकर मंगेवाडीच्या पाठीमागे कॅनलजवळ वाहन अडवून दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी संजय मल्हाप्पा कर्वे (वय ४३, रा. उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कर्वे हे सोनंद व डोंगरगाव येथे उसाच्या कांड्या खाली करून हटकर मंगेवाडीच्या रस्त्याने पिकअपमधून जात होते. कॅनलजवळ दुचाकीस्वाराने त्यांचे वाहन अडवून शिवीगाळ केली. कारण विचारले असता दगडाने डोक्यात मारहाण केली. तसेच धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही कर्वे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवले.

याप्रकरणी नितीन दादासाहेब भुसनर व नितीन दादासो व्हरगर (दोघे रा. हटकर मंगेवाडी) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. डोक्याला दगड लागल्याने कर्वे यांना रक्तस्राव झाला. त्यांनी जुजारपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com