विहीरीवरील मोटार बंद केल्याच्या कारणावरून वाद; शेतकऱ्याच्या डोक्यात दगड मारल्याची तक्रार

विहीरीवरील मोटार बंद केल्याच्या कारणावरून वाद; शेतकऱ्याच्या डोक्यात दगड मारल्याची तक्रार
Published on

मोटार बंद केल्यावरून
डोक्यात दगडाने मारहाण

सांगोला, ता. २४ : शेतातील विहिरीवरील मोटार बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादात शेतकऱ्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची तक्रार सांगोला पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना काशीदवाडी (सोनंद, ता. सांगोला) येथे २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत चंद्रकांत निवृत्ती खंडागळे (वय ५०, रा. काशीदवाडी, सोनंद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते शेतातील डाळिंबाच्या बागेवर फवारणी करीत असताना मोटार बंद झाली. मोटार का बंद झाली, हे पाहण्यासाठी ते विहिरीवर गेले असता तेथे आकाश खंडागळे होता. बाळासाहेब निवृत्ती खंडागळे, श्रीकांत निवृत्ती खंडागळे व जयश्री श्रीकांत खंडागळे तेथे आले. बाळासाहेब यांनी जवळ पडलेला दगड हातात घेऊन चंद्रकांत खंडागळे यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच आकाश खंडागळे याने त्यांना ढकलून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. चंद्रकांत खंडागळे यांच्या पत्नी जयश्री व मुली दिक्षा, गौरी तेथे आल्या. भांडण सोडविताना दिक्षा हिलाही ढकलून दिल्याचे फिर्यादीने सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com