लाॅकडाउनच्या काळातही शेतीच्या नफ्यातून 'तो' झाला करोडपती  

लाॅकडाउनच्या काळातही शेतीच्या नफ्यातून 'तो' झाला करोडपती  

निरगुडसर : कोरोनाच्या लॅाकडानच्या काळात अनेक तरकारी पिकांना बाजारभाव नव्हता, तर झेंडूच्या मळेच्या मळे फेकून दिले जात होती. त्यावेळी पुढे बाजारभाव मिळेल की नाही याची शाश्वती नसून देखील आंबेगाव तालुक्यातील वळती येथील शेतकरी धोंडीभाऊ भोर यांनी आपल्या नऊ एकर क्षेञावर टोमॅटो व आठ एकर क्षेञावर झेंडूचे अधुनिक पद्धतीने पिक घेण्याचे धाडस केले. त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली. योग्य नियोजन आणि मजूर टंचाईवर यशस्वी मात करत चांगल्या उत्पन्नाला उच्चांकी बाजारभावाची जोड मिळाली आणि शेतकरी भोर हे मिळालेल्या नफ्यातून करोडपती बनले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संपुर्ण जग लॅाकडाउनच्या चक्रात अडकून ठप्प झाले होते. या परिस्थितीत जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी थांबला नव्हता. तो शेतात दिवस-राञ काम करत होता. अशा लॅाकडाउनच्या परिस्थितीत अनेक व्यवसाय, शेती-उद्योग अडचणीत होते. त्यावेळी अनेक शेतक-यांनी धाडस दाखवत शेती पिकवली आणि लॅाकडाउनमध्येही यशस्वी करुन दाखवली आहे. त्यामध्ये शेतीच्या नफ्यातून भोर हे करोडपती बनले आहे.

वळती येथील प्रगतीशील शेतकरी धोंडीभाऊ भोर यांनी आपल्या नऊ एकर क्षेञावर टोमॅटो व आठ एकर क्षेञावर झेंडूचे अधुनिक पद्धतीने पिक घेतले. त्यासाठी खते, औषधे, मजूरी, रोपे आदींसाठी साधारण १५ लाखाहून अधिक खर्च आला.

सुरुवातीला ५ मे रोजी टोमॅटो व १० मे रोजी झेंडू पिवळा गोंडा पिकाची लागवड करण्यात आली. साधारण पुढील दोन महीन्यात दोन्ही पिकाची तोडणी सुरु झाली. दोन्ही मालाची बाजारपेठेत आवक कमी असल्याने बाजार उच्चांकी मिळाला. झेंडूला १०० रुपयांपासून ते १८० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. गणेशोत्सव व श्रावण महिन्यात उच्चांकी दर मिळाला. व्यापा-यांनी शेताच्या बांधावर येऊन माल खरेदी केला. यामध्ये झेंडूचे ७० टन उत्पन्न मिळाले.

दरम्यान, टोमॅटोलाही २०० रुपयांपासून ७०० रुपये प्रति कॅरेट भाव मिळाला. ५०० रुपयांहून अधिक दर जास्तीच्या कॅरेटला मिळाला. एकुण सहा हजार कॅरेटचे उत्पादन मिळाले. दोन्ही पिके घेताना मजुरांची टंचाईचा सामना करावा लागला. काही केल्या मजूर मिळत नव्हते. त्यानंतर कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी त्यांच्याकडे असलेले १० ते १२ मजूर भोर यांना उपलब्ध करुन दिले. 

झेंडु व टोमटो पिकातून खर्च वजा जाता एक कोटीहून अधिक नफा मिळाला. या शेतीच्या कामात धोंडीभाऊ भोर यांना त्यांचे बंधू मोतीराम भोर व त्यांच्या कुटुंबाची साथ लाभली. टोमॅटो पिकाची तोडणी मागील महिन्यात तर पावसामुळे सध्या झेंडूला बाजारभाव नसल्याने बागेची तोडणी बंद केली आहे.

कांदा, झेंडु व टोमॅटोने बनवले करोडपती..मागील वर्षी शेतकरी धोंडीभाऊ भोर यांनी आपल्या ५० एकरातील कांदयातुन चांगला नफा मिळवुन करोडपती बनले होते तर यंदा कोरोनाची महामारी असुन देखील झेंडु व टोमटो पिकात चांगले उत्पन्न घेऊन नफा मिळाला,उच्चांकी दर मिळवत सलग दुस-यांदा भोर हे करोडपती बनले आहे. ते पण अवघ्या १७ एकर क्षेञामध्ये त्यामुळे त्यांचे परीसरात कौतुक होत आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com