
माळेगाव : ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक सहयोग आणि शेतकरी मार्गदर्शन या महत्वपुर्ण बाबींच्या अनुषंगाने सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या. यापुढे अॅमेझॉनच्या भारतातील सर्व संकलन केंद्रावर प्रत्यक्ष तसेच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अॅमेझॉन प्लॅटफॉर्मचा वापर बारामती ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्रज्ञ करू शकणार आहेत. तसेच, विषमुक्त पीक उत्पादन, काढणी पश्चात तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
या करारापाटीमागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे कमी खर्चात अधिक उत्पादन व नफा मिळवण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती बारामती ट्रस्टचे मुख्य कार्य़कारी अधिकारी निलेश नलावडे यांनी दिली. ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनीही वरील उपक्रमाचे अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्री. नलावडे अधिकची माहिती देताना म्हणाले,`` अॅमेझॉनचे तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान केंद्राचा शेती क्षेत्रातील अनुभव व कार्य देशातील शेतकऱ्यांना ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार फायद्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील प्रगत शेतीची गाथा सर्वत्र पोहचेल.
तसेच, हवामान बदलाच्या वाढत्या समस्येत अडचणित सापडलेल्या शेतीला आणि शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी या दोन्ही संस्थांचे मार्गदर्शन महत्वपुर्ण ठरणार आहे. तसेच महिला बचत गट व शेतकरी उत्पादन कंपन्यांचे उत्पादने अॅमेझॉन मार्फत ग्राहकांपर्यंत पोचविण्याचेही उद्दिष्ट आहे. `` तत्पुर्वी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, की विषमुक्त रेसिडयु फ्री शेती कशी करावी, पर्यावरणाचा समतोल राखून प्रगत तंत्रज्ञानाद्वारे पीक उत्पादन कसे घ्यावे, यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (नवी दिल्ली) तयार केलेली नियमावली भारतात सर्व राज्यामध्ये पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
यावेळी अॅमेझॉन किसानचे सिद्धार्थ टाटा यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राबरोबर झालेल्या कराराबाबत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "भारतात इंटरनेटच्या प्रसारामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. याच कारणाने शेतीत उत्पादकता १५-२०% वाढली आहे. कृषी विज्ञान केंद्र हे शेती तंत्रज्ञान विकासात अग्रण्य संस्था आहे. संस्थेबरोबर करार करून अॅमेझॉनने शेती क्षेत्रातही नवीन तंत्रज्ञान आणण्यास कटिबद्ध राहील.`` यावेळी अॅमेझॉनच्या कृषी नियामक विभागाचे डॉ. शशीन शोभणे, स्वाती नायक, प्रदीप भापकर, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे, संतोष गोडसे हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.