Leopard Attack : आणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी

मका पिकाला पाणी देत असताना, बिबट्याच्या हल्ल्यात किरण तुळशीराम दाते हा शेतकरी जखमी झाला.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

बेल्हे - आणे (ता. जुन्नर) येथे नळावणे रस्ता परिसरात आज (ता. ५) दुपारच्या वेळी, मका पिकाला पाणी देत असताना, बिबट्याच्या हल्ल्यात किरण तुळशीराम दाते (वय - ३५ वर्षे) ' हा शेतकरी जखमी झाला. दरम्यान त्यांच्यावर नारायणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी मंचर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, आणे येथे नळावणे रस्ता परिसरात किरण तुळशीराम दाते यांनी शेतात मका पीक घेतले आहे. तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिकांना पाण्याची गरज भासत असल्याने, किरण दाते हे दुपारच्या वेळी शेतात मका पिकाला पाणी देत होते.

यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केल्याचे सांगण्यात आले. बिबट्याच्या हल्ल्यात  त्यांच्या उजव्या कानाजवळ तसेच डोक्यावर कपाळाच्या वरील बाजूला आणि डोक्यावर मागील बाजूला जखमा झाल्या आहेत. यावेळी त्यांनी बिबट्याला प्रतिकार करत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून जिवाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे वनरक्षक राजेंद्र गाढवे, विशाल गुंड, महेश जगधने या वनकर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किरण तुळशीराम दाते (वय - ३५ वर्षे) यांना नारायणगाव येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी मंचरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे वनकर्मचारी राजेंद्र गाढवे यांनी सांगितले.

दरम्यान ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ व बेल्ह्याच्या वनपाल नीलम ढोबळे यांनीही, रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किरण तुळशीराम दाते यांच्या प्रकृतीची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली. दरम्यान आणे येथे नळावणे रस्ता परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com