'मोदी सरकार योग्य बाजारभाव देत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ'

'मोदी सरकार योग्य बाजारभाव देत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ'

तळेगाव ढमढेरे : मोदी सरकार शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने उत्पादन खर्च व बाजारभाव देत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी तळेगाव ढमढेरे येथे बेळगाव ते सातारा शेतकरी जनप्रबोधन यात्रेचे शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले

यावेळी ग्रामस्थांतर्फेे रघुनाथदादा पाटील यांचा सत्कार करून आसूड भेट देण्यात आला. यावेळी पाटील म्हणाले की, शासनाकडून कृषी कायदे व कृषी मूल्य आयोगाचे पालन होत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी निपाणी-बेळगाव ते सातारा अशी जन प्रबोधन यात्रा शेतकरी संघटनेचे प्रणेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कायदे व त्या कायद्याप्रति शेतकऱ्यांचे अज्ञान याविषयी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी नांदखिले, बाळासाहेब घाडगे, डॉ.धनंजय खेडकर, राजू ढमढेरे, श्रीकांत ढमढेरे, घनश्याम तोडकर, चिंतामण ढमढेरे,  राजाभाऊ ढमढेरे, बाळासाहेब तोडकर, राजाभाऊ भुजबळ, सुधीर ढमढेरे, सूर्यकांत ढमढेरे, सुधीर गायकवाड, दीपक पवार व शेतकरी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेच्या मागण्या:-सर्व शेतकऱ्यांना कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ६० रुपये भाव द्यावा. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com