Video : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी कमी पडू देणार नाही : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 November 2019

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.''अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही'', असे ते यावेळी म्हणाले.

पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, फळबागांचे पंचनामे 6 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ''अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणे शासनाची जबाबदारी असून त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही,'' असेही ते यावेळी म्हणाले.

महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील अतिवृष्टीनेग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers affected by heavy rainfall will not fall short of funds said Chandrkant patil