शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा 'लाल चिखल'; टोमॅटो रस्त्यांवर फेकून देण्याची आली वेळ

विवेक शिंदे
गुरुवार, 23 एप्रिल 2020

आंबेगाव तालुक्यात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

महाळुंगे पडवळ Pune Coroanvirus : लॉकडाउनमुळे टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने आंबेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून देण्याचा प्रसंग ओढावला आहे. टोमॅटो उत्पादनातून चार पैसे कमावण्याच्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा "लाल चिखल' झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आंबेगाव तालुक्‍यात कळंब, चांडोली बुद्रूक, लौकी, चास, साकोरे, महाळुंगे पडवळ, सुलतानपुर आदी घोडनदी काठच्या 40 गावात दर वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटोची पाच ते सहा हजार एकर क्षेत्रात लागवड केली जाते. टोमॅटोचा तोडणी हंगाम एप्रिलपासून सुरू होतो. कोरोनामुळे टोमॅटोचे पूर्ण पीक बाजारभाव नसल्याने हातातोंडाशी आलेला घास रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी अन्‌ आता कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एक एकर क्षेत्रातील टोमॅटो काढणीला आली आहे. मागणी नसल्याने रोपे, औषधे व मजुरीसाठी एकरी 30 ते 35 हजार रुपये केलेला खर्च वाया गेला आहे. मोलाचा टोमॅटोचे पीक अक्षरशः जनावरांना टाकावे लागत आहे.
 - संतोष बारवे
शेतकरी, चास (ता. आंबेगाव)  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Ambegaon threw away tomatoes