मालकाच्या आणि मुक्या जनावरांच्या डोळ्यातून धारा लागल्या वाहू... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fodder

मालकाच्या आणि मुक्या जनावरांच्या डोळ्यातून धारा लागल्या वाहू...

sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : वेळी रात्रीची दीड...निरवांगी (ता. इंदापूर) गावातील सर्जेराव काशिद यांच्या जनावरांच्या चाऱ्याच्या गंजीला लागलेली आगीमुळे काशिद कुंटूबाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. आत्ता जनावरांना खायाला काय घालू हा प्रश्‍नामुळे कुंटूब हतबल झाले होते. अज्ञान व्यक्तीने द्वेषापोटी चाऱ्याची गंज पेटविल्याने काशिद यांचे सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले असून ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात रेशनवर २४ हजार टन धान्याचे मोफत वितरण

इंदापूर तालुक्यातील निरवांगी गावाजवळील काशिदवस्तीवर सर्जेराव गणपत काशिद (वय ६५) यांचे कुंटूब राहत आहेत. २४ एकर शेतीमध्ये काबाडकष्ट करुन काशिद दोन मुले व कुंटूबाच्या मदतीने संसाराचा गाडा हाकत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत असून ३५ जनावरांचा गोठा आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची टंचाईला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये चार टंचाई जाणवू नये म्हणून काशिद यांनी याेग्य नियोजन करुन १२ एकर क्षेत्रातील मकेच्या चाऱ्याची गंज लावून घराजवळ ठेवली होती. मात्र अज्ञात व्यक्तिने द्वेषापोटी गुरुवार (ता.२०) रात्री चाऱ्याच्या गंजीला चारही बाजून आग लावल्याने पाच हजार मकवानाच्या चाऱ्याच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. डोळ्यासमोर जळणार चाऱ्याची गंज पाहून काशिद कुंटूबाच्या डाेळ्यातून अश्रु वाहत होते. पावसाळा सुरु होण्यासाठी वेळ असून आहे. पावसानंतर सुमारे दाेन महिन्यानंतर हिरवा चारा उपलब्ध होत असतो. तोपर्यंत जनावराला काय खायायला घालायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: ‘म्युकरमायकोसिस’साठी पुणे महापालिकेची स्वतंत्र नियमावली

कांदा चाळीचे नुकसान टळले...चाऱ्याच्या गंजीजवळ काशिद यांची कांदाचाळ आहे. चार एकरातील कांदा त्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवला होता. सुदैवाने आगीच्या ज्वला कांदाचाळीपर्यंत पोहचल्या नसल्याने मोठे नुकसान टळले.

गावकरी देणारी मदतीचा हात...सर्जेराव काशिद यांच्या ५ हजाराच्या गंजीला आग लागल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून माजी सरपंच दशरथ पोळ, बाळासाहेब गायकवाड, पोपट शेंडे, सोमनाथ ढवळे, दत्तात्रेय पोळ यांनी मदतीचा हात देणार असून काशिद यांना शेतातील चारा देणार आहे.

loading image
go to top