esakal | ‘म्युकरमायकोसिस’साठी पुणे महापालिकेची स्वतंत्र नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

Rubal Agarwal

कोरोनाच्या काही अत्यवस्थ रुग्णांवर १५ दिवसांपासून महिना-दीड महिना उपचार केले जातात. त्यात ऑक्सिजन आणि आयसीयूमधील रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांत धूळ, सूक्ष्मजीव आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते.

‘म्युकरमायकोसिस’साठी पुणे महापालिकेची स्वतंत्र नियमावली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ऑक्सिजन आणि ‘आयसीयू’तील कोरोना रुग्णांना ‘म्यूकरमायकोसिस’पासून लांब ठेवण्यासाठी उपचार साहित्यांची नियमित स्वच्छता करा, ते वेळोवेळी निर्जंतुकरण करावे, जुनाट साहित्याचा वापरू नसावा, या साहित्यांपासून रुग्णांना त्रास होतो आहे का, ते जाणून घ्या...अशा सूचना करतानाच अत्यवस्थ रुग्णांवरील उपचाराचे ‘ऑडिट’ करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. (special guidelines for mucormycosis informed PMC Additional Commissioner Rubal Agarwal)

उपचाराआधी रुग्णाची प्रकृती कशी होती, उपचाराचा कालावधी, त्यातील साहित्याचा वापर, त्याचे स्वरुप यावरही महापालिका आता लक्ष ठेवणार आहे. रुग्णालयांतील अस्वच्छ उपचार साहित्यांपासून बुरशीजन्य आजाराची लागण होण्याच्याही भीती असल्याने महापालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे रुग्णांची खूप काळजी घेण्याची ताकीद खासगी, महापालिका रुग्णालयांना दिली आहे.

हेही वाचा: पुण्यात लसीकरण बंद; राज्य सरकारकडून लशीचा पुरवठा नाही

कोरोनाच्या काही अत्यवस्थ रुग्णांवर १५ दिवसांपासून महिना-दीड महिना उपचार केले जातात. त्यात ऑक्सिजन आणि आयसीयूमधील रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांत धूळ, सूक्ष्मजीव आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. तसेच, रुग्णालयांच्या वातावरणात सामान्यत: रोगकारक जिवाणू किंवा विषाणू आढळतात. अशा वेळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास ‘म्युकरमायकोसिस’ सारख्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

रुग्णालयांतून बुरशी संसर्गाची ठिकाणे :

- ऑक्सिजन मास्क आणि पाईप

- ऑक्सिजन थेरपीत वापरले जाणारे पाणी

- वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाणारे साहित्य

- जेवण, पिण्याचे पाणी

- अंथरूण, पांघरुणासह वापरातील इतर साहित्य

हेही वाचा: पुण्यात नेमके ‘स्मार्ट’ काय?

बुरशी संसर्ग रोखण्यासाठी :

- ऑक्सिजन मास्क आणि पाइप वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक - ऑक्सिजन थेरपीत वापरले जाणारे पाणी स्टराईल असणे गरजेचे

- वैद्यकीय उपचारात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे निर्जंतुकीकरण आवश्यक

- रोज साफ-सफाई बरोबरच परिसरातील निर्जंतुकीकरणाला प्राधान्य द्यावे.

- बुरशीच्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी हवा खेळती राहणे आवश्यक

बुरशी संसर्गाचा धोका का?

कोरोना उपचारादरम्यान वापरण्यात येणारे स्टेरॉईड आणि ॲन्टिबायोटीक्समुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशावेळी स्वच्छता न ठेवल्यास नाक आणि तोंडाद्वारे बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता असते. शरिरातील रोगप्रतिकारशक्तीच कमी झाल्यामुळे आणि उपचारादरम्यान रक्तातील साखर वाढल्याने बुरशीच्या वाढीला पोषक वातावरण मिळते. पर्यायाने हा संसर्ग अधिक गंभीर रूप धारण करू शकतो.

हेही वाचा: प्रेम कोठे जमेना; स्थळ काही येईना

कोरोनाचे संकट कायम असतानाच ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण वाढत आहेत. हा आजार वाढणार नाही, यासाठी स्वतंत्र नियमावली करीत आहोत. त्यात ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शनानुसार रुग्णालयांतील उपचार पद्धती जाणून घेत आहोत. त्यातील त्रुटींमुळे लोकांना आजार होऊ नये, म्हणून काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा काळात बेजाबदारपणे उपचार करणाऱ्या रुग्णांलयांवर कारवाई होईल.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

रुग्णालयांतील साहित्याचा सतत वापर होत असल्याने त्यांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची गरज असते. ती न केल्यास रुग्णांना धोका होऊ शकतो, ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. अशा साहित्याच्या देखभाल-दुरुस्तीची रुग्णालयांकडे सोय हवी.

- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण अधिकारी, पुणे महापालिका

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image