

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना
२३ कोटींची मदत जाहीर
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी स्पष्ट केले, की शेतकऱ्यांना मिळणारा हा मदत निधी त्यांच्या कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळता करून घेतला जाऊ नये, अशा कडक सूचना सर्व बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण विभागांतील १७ हजार २४५ बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत २७ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
राज्यातील एकूण ११,२०७.७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार २४५ शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यांतील ९६८३ बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुणे विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील ६५६५ बाधित शेतकऱ्यांसाठी ९ कोटी १३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ६६१ बाधित शेतकऱ्यांसाठी ३८ लाख ८७ हजार रुपये, तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ बाधित शेतकऱ्यांसाठी ४१ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मदतीचे वाटप करताना एकाच व्यक्तीला दोनदा लाभ होणार नाही, याची खबरदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा, असे निर्देशही शासनाने दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.