द्राक्षाने मारले; भोपळ्याने तारले!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

हवामानातील बदलाचा शेती व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. पावसाच्या अनिश्‍चितमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे.

वालचंदनगर : भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील बोराटे कुंटूबाचे परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, त्यांनी द्राक्षामध्ये दुधी भोपळ्याची लागवड करून चांगले उत्पादन घेतले आहे. या उत्पादनातून बोराटे कुंटूबाला आधार मिळाला आहे.

हवामानातील बदलाचा शेती व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. पावसाच्या अनिश्‍चितमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. इंदापूर तालुक्‍यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून अवकाळी व परतीच्या पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान होत आहे. याचा फटका भरणेवाडीमधील बोराटे कुंटूबाला देखील बसला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

बोराटे कुंटूबाकडे 25 एकर क्षेत्र असून दत्तात्रेय बोराटे, उत्तम बोराटे, प्रल्हाद बोराटे, दादाराम बोराटे, सुरेश बोराटे व भरत बोराटे हे सहा भाऊ एकत्र शेती व्यवसाय करीत आहेत. पाच एकरामध्ये त्यांनी द्राक्षाची लागवड केली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी वातावरणातील बदलाचा फटका बसल्यामुळे बोराटे यांच्या द्राक्षाचे नुकसान झाले. त्यांनी सव्वा एकरामध्ये द्राक्षाच्या स्टेजिंगवर प्रायोगिक तत्त्वावर दुधी भोपळ्याची लागवड केली. लागवडीनंतर दोन महिन्यानंतर भोपळ्याचे उत्पादन सुरू झाले. सव्वा एकरामध्ये भोपळ्याचे चार टन उत्पादन निघाले. सरासरी 20 रुपयांचा दरही मिळाल्यामुळे 80 हजार रुपयांचे उत्पादन निघाले.

गतवर्षीही परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बोराटे यांनाही गतवर्षी भोपळ्याच्या पिकाने तारल्यामुळे द्राक्षापासून होणारे नुकसान टळले. चालू वर्षीही ढगाळ वातावरणामुळे व जास्त पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. बोराटे यांनी चालू वर्षी द्राक्षाच्या अडीच एकर बागेमध्ये भोपळा लावला असून आतापर्यंत अडीच एकरामध्ये अडीच लाख रुपयांचा भोपळा विकला असून अजून दोन महिने भोपळ्याचे उत्पादन निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत
 

भोपळ्याची शेतीही फायदेशीर
द्राक्षाच्या तुलनेमध्ये भोपळ्याचा उत्पादन खर्च कमी असून औषध फवारणीचा खर्च कमी आहे. वातावरण स्वच्छ असल्यास विक्रमी उत्पादन निघत असून सव्वा एकरामध्ये दररोज सरासरी 500 किलो भोपळा निघू शकत असल्याने ही पीक फायदेशीर असल्याचे उत्तम बोराटे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Bharnewadi produce milk gourd in grapes