

स्वतंत्र शेतकरी आयोग स्थापन करा
आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
चंद्रपूर : कर्जबाजारीपणा, पीकविमा, नुकसानभरपाई, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता अशा विविध समस्यांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी आयोग स्थापन करावा. या आयोगाला कायदेशीर अधिष्ठान देण्यासाठी स्वतंत्र कायदा करून आर्थिक व प्रशासकीय तरतूद करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्यात १ कोटी ७१ लाख ११ हजार कृषी धारणांची नोंद असून, त्यांचे क्षेत्र सुमारे २१०.७९ लाख हेक्टर आहे. एवढ्या मोठ्या कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्वतंत्र आणि समन्वयात्मक यंत्रणा आवश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रस्तावित आयोग केवळ शिफारशी करणारा न राहता शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागांकडून माहिती मागविणे आणि प्रश्नांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणारा असावा. आयोगाच्या शिफारशींवर ९० दिवसांत निर्णय घेणे, निर्णय अमान्य असल्यास त्याची कारणे लेखी कळविणे आणि वार्षिक अहवाल विधान मंडळासमोर सादर करणे बंधनकारक करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या आयोगात अनुभवी शेतकरी प्रतिनिधी, कृषी व अर्थतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्रतिनिधी, महिला शेतकरी तसेच सहकार आणि पणन क्षेत्रातील जाणकारांचा समावेश करावा. तसेच प्रत्येक विभागात तक्रार निवारण यंत्रणा उभारावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.