

Farmers Intensify Stir Over Pending Payments, Call for Indefinite Protest in Pune
esakal
पुणे/सातारा: साखर कारखाने बंद होऊन दोन महिने उलटले, तरी सातारा जिल्ह्यातील बळीराजाच्या झोळीत त्याच्या हक्काची ३८० कोटी रुपयांची FRP पडलेली नाही. प्रशासकीय सुनावण्यांचा फार्स संपवून आता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे. "जर शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नसतील, तर साखर आयुक्तांना खुर्चीवर बसू देणार नाही," अशा आक्रमक पवित्र्यात भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रविण पी. बाबर यांनी थेट ३० एप्रिल रोजी पुण्यातील साखर संकुलावर 'बेमुदत चक्का जाम' आंदोलनाची घोषणा केली आहे.