उरुळी कांचन - विकासकामांना आमचा नेहमी पाठींबा आहे. रिंगरोड करण्यासाठी आमच्या जमिनी घ्या. मात्र, मोबदला रेडी रेकनरच्या पाच पटीने मिळाला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत कदमवाकवस्ती येथील शेतकऱ्यांनी आपले म्हणणे प्रशासनापुढे मांडले आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात आयोजित प्रशासन व शेतकरी यांच्यामध्ये प्रारुप विकास योजनेतील ६५ मीटर रुंद रस्त्यासाठी सन २०१५ च्या नवीन भूसंपादन अधिनियमाव्दारे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करावयाच्या जमिनीच्या भूसंपादन या प्रस्तावासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मोबदल्याबाबत भूमिका स्पष्ट केली.
यावेळी पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, भूसंपादन कारकून विद्या गायकवाड, मंडलाधिकारी योगिता गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता अरविंद माळी, वरिष्ठ अभियंता अमित हस्ते, तहसीलदार आशा होळकर, पुणे जिल्हा भूमी अभिलेखचे निरीक्षक जयसिंग गाडे, लिपिक रोहित चोपडे, भूकरमापक स्नेहा भिसे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे, सुरेखा काकडे, एकनाथ ढाके आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी काही शेतकऱ्यांचे क्षेत्र रिंग रोडमध्ये गेले आहे. मात्र त्यांचे या यादीत नावे नाहीत. मग त्यांना मोबदला मिळणार का? तसेच शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर रस्त्याच्या रुंदीकरण, रिंग रोड, शिवरस्ता याबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या.
पीएमआरडीए व भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सूचनांची नोंद करून घेतली. यावेळी माधव काळभोर, चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण, ग्रामसेवक अमोल घोळवे व शेतकरी उपस्थित होते.
रिंगरोडसाठी अंदाजे १७ एकर जमीन
पुणे रिंग रोड हा ६५ मीटरचा असून बावडी, लोहगाव, वाघोली, मांजरी खुर्द, कदमवाकवस्ती येथील रिव्हर व्ह्यू सिटीच्या जवळून पिराच्या मंदिरापासून फुरसुंगी व पुढे वडकीच्या दिशेने जाणार आहे. या रिंगरोडमध्ये कदमवाकवस्ती येथील शेकडो शेतकऱ्यांची अंदाजे १७ एकर जमीन ( ६७५८१.५४ चौ. मी.) या रस्त्यामध्ये जाणार आहे. प्रशासनाला जमीन खरेदी करून क्षेत्र विकत घ्यायचे आहे.
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र हे रिंग रोड मध्ये जात आहे. त्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र देऊन विकासात हातभार लावावा. या क्षेत्राच्या बदल्यात शेतकऱ्यांना शासनाकडून रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला देण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येत आहे.
- कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी, पुणे भूसंपादन विभाग
शासनाला आम्ही क्षेत्र देण्यासाठी तयार आहोत मात्र, रेडी रेकनरच्या अडीच पटीने मोबदला न देता तो रेडी रेकनरच्या ५ पटीने मोबदला द्यायला हवा, ५ पटीने मोबदला मिळणार असेल तरच आम्ही आमच्या जमिनी देऊ. अन्यथा आम्ही जमिनी देणार नाहीत.
- गणपत चावट, शेतकरी, कदमवाकवस्ती (ता. हवेली)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.