शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका : चंदू चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - ‘‘लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. देशासाठी काही करावे, ही तीव्र इच्छा मनात असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालो. भारत-पाक चकमकीत पाकच्या तावडीत सापडलो. अनेक यातना सहन केल्या. तीन महिने व २१ दिवस माझ्यासमोर मृत्यू दिसत होता. पण, मी हरलो नाही. शेतकऱ्यांनीही संघर्ष करावा, पण कोणत्याही स्थितीत आत्महत्या करू नये,’’ असे आवाहन पाकिस्तानातून सहिसलामत सुटून भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांनी केले. आपला संघर्ष उलगडताना ते  भावनाविवश झाले. 

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे एका कार्यक्रमात बोलताना चंदू चव्हाण म्हणाले, ‘‘माझ्यासारखे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. पाकिस्तानच्या जेलमध्ये प्रत्येक क्षणाला मृत्यू दिसत होता. दरम्यान, गावाकडे आजीचे निधन झाले. आजीसाठी रडू की, पकडलेल्या भावासाठी रडू, अशी परिस्थिती माझ्या भावाची झाली. अखेर तो दिवस उजाडला आणि पुनर्जन्म घेऊन मी भारतात परतलो. येथून पुढे देशासाठी जगत राहणार आहे. यातना सहन कराव्या लागल्या, परंतु देशाबद्दलची निष्ठा ढळू दिली नाही. आयुष्यात संघर्ष झाला, तरी  डगमगू नका.’’ 

Web Title: Farmers do not commit suicide says Chandu Chavan