
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबजारात आज १२ हजार ८२ कांदा पिशव्यांची (६ हजार ४१ क्विंटल) आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती किलोग्रॅम १०० रुपये ते १२० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.
नारायणगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबजारात आज १२ हजार ८२ कांदा पिशव्यांची (६ हजार ४१ क्विंटल) आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती किलोग्रॅम १०० रुपये ते १२० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. गोळा कांद्याला प्रती किलोग्रॅम ९० रुपये ते १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावाने आज शंभरी गाठल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील अनेक वर्षांत येथील उपबाजारात मिळालेला हा उचांकी भाव आहे. अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, रविवारी (ता १८ )आळेफाटा उपबजारात झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रती किलोग्रॅम ७५ रुपये ते ८२ रुपयांच्या दरम्यान तर गोळा कांद्याला प्रती किलोग्रॅम ६५ रुपये ते ७५ रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला होता. मागील दोन दिवसांत कांद्याच्या भावात प्रती किलोग्रॅम वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झाली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आज (ता. २०) आळेफाटा उपबजारात झालेल्या लिलावात कांद्याला प्रतवारीनुसार मिळालेला भाव पुढील प्रमाणे ( दहा किलोग्रॅम) :- उच्च प्रतीचा कांदा: १००० ते १२१० रुपये, एक नंबर गोळा : ९००ते १०००रुपये, दोन नंबर:७०० ते ९०० रुपये, तीन नंबर: ते ५०० ते ७०० रुपये,चार नंबर बदला : २५० ते ५०० रुपये.
या वर्षी सततच्या पावसामुळे हवेत आद्रता वाढल्याने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याची सड झाल्याने पन्नास ते साठ टक्के नुकसान झाले आहे. शिल्लक कांद्यात बदला कांद्याचे प्रमाण जास्त आहे. विक्रीसाठी येणारा सर्वच कांदा शेतकऱ्यांचा नाही. काही व्यापाऱ्यांचा देखील कांदा चाळीत आहे. हे व्यापारी मंदीत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून चाळीत साठवून ठेवतात. या मुळे भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला असे म्हणता येणार नाही. काही वेळा भाव न वाढल्यास हे व्यापारी सुद्धा अडचणीत सापडतात. आशा वेळी काही व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवून पसार होतात.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एप्रिल महिन्यात ३०० गोणी कांदा चाळीत साठवला होता. या पैकी जवळपास शंभर गोणी कांदा सडला. आज निवड करून सतरा गोणी कांदा विक्रीसाठी नेला होता. या पैकी आठ गोणी गोळा कांदा तर उर्वरित नऊ गोणी तीन व चार नंबरचा होता. गोळा कांद्याला १२० रुपये प्रति किलो भाव मिळाला. तर तीन व चार नंबर प्रति किलो ३० रुपये ते ५० रुपये भाव मिळाला. शिल्लक कांद्यात बदला जास्त निघतो, यामुळे बाजार वाढून फार पैसे मिळतील अशी स्थिती नाही.-आस्वाद थोरवे (शिरोली बुद्रुक)
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)