कर्जमाफी व पिकविम्यासाठी वांगी बु येथे अन्नत्याग आंदोलन

कर्जमाफी व पिकविम्यासाठी  वांगी बु येथे अन्नत्याग आंदोलन
Published on: 

कर्जमाफी, पीकविम्यासाठी वांगी बु येथे अन्नत्याग आंदोलन

माजलगाव, जि. बीड : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजलगाव तालुक्यातील वांगी बु येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (ता. २२) ‘एक गाव अन्नत्याग आंदोलन’ करण्यात आले. कर्जमाफी आणि पीकविमा मंजुरीच्या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ सरसकट सर्व शेतकऱ्यांना लागू करणे, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १७ हजार ५०० रुपये पीकविमा मंजूर करणे तसेच खरीप २०२६ पीकविमा योजनेत पूर्वीप्रमाणे चार ट्रिगरचा समावेश करणे, या मागण्यांचा समावेश होता.

यावेळी भाई गंगाभीषण थावरे म्हणाले, ‘‘अवकाळी पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफी व पीकविमा संदर्भातील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.’’

मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनामुळे परिसरात शेतकरी प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

छायाचित्र ओळ :
माजलगाव तालुक्यातील वांगी बु येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी भाई गंगाभीषण थावरे व अन्य शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Maharashtra Farmer Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com