इंदापूर, माळशिरसच्या शेतकऱ्यांना नीरामाई पावली

राजकुमार थोरात
Thursday, 3 September 2020

नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये चालू वर्षी शंभर टक्के पाणी साठा झाल्याने वीर धरणातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर व माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यासाठी वरदान ठरलेली नीरा नदी सध्या दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये चालू वर्षी शंभर टक्के पाणी साठा झाल्याने वीर धरणातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नीरा नदी ही इंदापूर (पुणे) व माळशिरस (सोलापूर) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. इंदापूर तालुक्‍यातील तावशी, उद्घट, जांब, कुरवली, चिखली, कळंब, वालचंदनगर, निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी, चाकटी, पिठेवाडी, भगतवाडी, नीर-निमगाव, सराटी, लुमेवाडी, गिरवी व माळशिरस तालुक्‍यातील कळंबोली, बांगार्डे, पळसमंडळ, चाकोरे, अकलूज, माळीनगर या गावांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांना नीरा नदीच्या पाण्याचा फायदा होतो. अनेक गावांच्या पाणी योजना ही नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. 

पुण्यात चार लाख नागरिकांना ई पास

तसेच, अनेक शेतकऱ्यांनी नीरा नदीवरती पाइपलाइन करून शेतामध्ये पाणी आणले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका तसेच उसाची लागवड केली असून, नदीच्या पाण्यामुळे नीरा नदी काठच्या शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याच्या प्रश्‍न मिटला आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीला नीरा नदीवरील सर्व बंधाऱ्यावरचे ढापे टाकून पाणी अडविण्यात येते. सध्या इंदापूर तालुक्‍यासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून, पावसाचा अंदाज घेऊन 15 सप्टेंबरनंतर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे ढापे टाकण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

नीरा नदीला दुथडी भरून वाहत आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला असून शेतकरी समाधानी आहेत. नदीकाठच्या पिकांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. 
- दशरथ पोळ, माजी सरपंच, निरवांगी (ता. इंदापूर) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Indapur, Malshiras taluka were relieved by the water of Nira river