esakal | इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा...
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा...

इंदापूर तालुक्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा...

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर ,बारामती तालुक्यासह जिल्हामध्ये रविवारी (ता.६) रोजी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला होता. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सणसर,बेलवाडी,जाचकवस्ती परीसरामध्ये सर्वाधिक सणसर परीसरामध्ये १३३ मि.मी, अंथुर्णे परीसरामध्ये  ५५ मि.मी, निमगाव ४९ मि.मी.व   बावडा परीसरामध्ये ४३ मि.ली. पावसाची नोंद झाली होती.

अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, ऊस, सुर्यफुले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतला आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. बारामती तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी पंचनामे करण्यास सुरवात झाली होती. इंदापूर पंचनामे सुरु झाले नसल्याने शेतकरी हवालदील झाले होते. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ९ सप्टेंबर रोजी तालुक्यातील गाव कामगार तलाठी,कृषी साहय्यक व  ग्रामसेवकांना शेतीतील पिकांचे नुकसान,घराचे झालेले नुकसान व इतर नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे होणार शेतीच्या पिकाचे व घराचे पंचानामे...
वादळी वारा व पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.त्याचा पंचनामा करण्यात येणार असून संबधित शेतकऱ्याचा जबाब घेण्यात येणार आहे.नुकसानग्रस्त क्षेत्राचा फोटो, सातबारा,८ अ उतारा,बॅंक पासबुक झेराॅक्स,आधारकार्ड झेरॉक्स,पॅन कार्ड झेरॉक्स सहीत सदरचा पंचानामा व अहवाल कृषी,साहय्यक तलाठी व मंडल अधिकारी यांच्या  संयुक्त सहीने सादर करावयाचा आहे. तसेच घराचा पंचानामा असल्यास घराचा फोटोसहीत वरील कागदपत्रे ग्रामसेवकाच्या सहीने सादर करावयची आहेत. 

शिवसेनेने केली होती पंचनाम्याची मागणी..
इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना पत्र देवून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यासंदर्भात निमसाखर येथील शेतकरी नारायण महादेव पवार यांनी सांगितले की, माझी अर्धा एकर फुलोऱ्यामध्ये बाजरी वादळी वारा व पावसाने भुईसपाट झाली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे हाेणार असल्याचे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)