
पुणे : ‘‘शेतकरी जेव्हा संकटात असतो, तेव्हा त्याला त्वरित सल्ला आणि मदतीची गरज असते. त्यासाठी एक समर्पित कॉल सेंटर आवश्यक आहे. शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करावे,’’ अशी सूचना कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कृषी खात्याला केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी या वेळी केली.