Aaditya Titar
sakal
आळेफाटा - आळे (ता. जुन्नर) येथील आदित्य सोमनाथ तितर याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मंडळ कृषी अधिकारी वर्ग २ पदी निवड झाली. शेतकरी असलेले वडील शेतकरी सोमनाथ तितर यांचे स्वप्न आदित्यने पूर्ण केले आहे. या निवडीमुळे आळे पंचक्रोशीतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.