Farmer Agitation | राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Agitation
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचा ठिय्या

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर - महावितरणने इंदापूर तालुक्यामध्ये सुरु केलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील घरासमोर आज गुरुवार (ता.२५) क्रांतिसिंह नाना पाटील बिग्रेड शेतकरी संघटनेचे वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

इंदापूर तालुक्यामध्ये महावितरणने मनमानी कारभार सुरु केला असून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची बेकायदेशीर वीज तोडणी मोहिम सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून पिके सुकू लागली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या रब्बीच्या पेरण्यादेखील रखडल्या आहेत. दोन दिवसापासून तर महावितरण्याच्या मुख्य सबस्टेशनमधून वीज बंद करण्यात येत आहे. यामुळे नियमित वीज बिल भरणाऱ्याही शेतकऱ्यांची वीज बंद झाली आहे. महावितरण शेतकऱ्यावर अन्याय करीत असल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने आज गुरुवार (ता. २५) रोजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या घरासमोरच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

हेही वाचा: केशवनगरमध्ये अति उच्च दाबाची वीजवाहिनी व जमीनीचे अंतर कमी झाले कमी

आंदोलनामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बिग्रेड शेतकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,तालुकाध्यक्ष गुलाब फलफले,निलकंठ शिंदे, माउली वनवे सहभागी झाले होते. यावेळी रायते यांनी सांगितले की, महावितरण शेतकऱ्यावर अन्याय करीत आहे. न्यायालयाने शेतकऱ्यांची वीज नोटीस दिल्याशिवाय तोडू नये, असा आदेश असताना देखील बेकायदेशीर वीज तोडली जात आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या दुप्पट रक्कम अनुदान म्हणून राज्यसरकारने महावितरणला दिली असताना देखील वीज खंडीत केली आहे. सबस्टेशनमधून वीज बंद करता येत नसून बेकायदेशीर वीज खंडीत केल्यामुळे शेतकरी भरडला जात आहे. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे लक्ष वेधून घेवून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगितले.

loading image
go to top