केशवनगरमध्ये अति उच्च दाबाची वीजवाहिनी व जमीनीचे अंतर कमी झाले कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवनगर येथील ऑस्कर इंग्लिश मिडीयम स्कूल जवळील नदीलगत अति उच्च दाबाच्या तारांखाली उभा असलेला अति-ज्वलनशील पदार्थाची टॅंकर

केशवनगरमध्ये अति उच्च दाबाची वीजवाहिनी व जमीनीचे अंतर कमी झाले कमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंढवा(पुणे) : केशवनगर येथील ऑस्कर इंग्लिश मिडीयम स्कूल जवळील नदीपात्रात जुन्या बांधकामांचा राडा-रोडा व कचरा गेल्या अनेक वर्षापासून टाकल्याने अति उच्च दाबाची वीज वाहिनी आणि जमीनीचे अंतर कमी झाले आहे. वीज वाहिन्या खाली मोठी वाहने पार्क केली जात असल्याने दुर्घटना होण्याआधी, नदी पात्रातील टाकलेला भराव पालिकेने इतरत्र हलवावा व नदी पात्र भराव मुक्त करण्याचे आदेश त्वरीत द्यावेत अशी मागणी नागरिकांनी लेखी पत्राद्वारे रहिवाश्यांनी केली आहे.

केशवनगर येथून नदी पात्रालगत ११,००० केव्हीची अति उच्च दाबाची वीज वाहिनी खांबावरून गेल्या आहेत. नदीपात्रातील भरावामुळे वीज वाहिन्या व जमिनीचे अंतर कमी झाले आहे. येथील स्थानिक नागरिक या ठिकाणी लहान-मोठी वाहने पार्क करतात. तर काही बेवारस वाहने विजेच्या तारांखाली लावलेल्या असतात.त्यामुळे दुर्घटना होण्यची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी निष्पाप टेम्पो चालक ताडपत्री टाकतांना विजेचा धक्का लागून मरण पावला होता.

हेही वाचा: सिंहगड परिसरात वनविभागाची कारवाई : शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त

याठिकाणी आता अति-ज्वलनशील पदार्थाची टॅंकर विजेच्या तारा खाली लावला जात असल्याने तारा व टॅंकर मधील अंतर सुमारे चार फुटांचे असल्याने मोठी दुर्घटना होऊन येथील निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मातीच्या ढिगावरून पाय घसरून पडल्यास गंभीर दुखापत अथवा नदीत बुडून मृत्यू होऊ शकतो.

पुणे महानगरपलिका आयुक्त विक्रम कुमार, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय सहा. आयुक्त प्रसाद काटकर, मनपा आरोग्य कार्यालय व नगरसेवक वसंत मोरे यांना येथील रोमा जैन, अपूर्वा माने, हारून मिश्रा, आफ्रीद खान, त्रिंबक पलांडे, पंकज पवार, मंदाकिनी भंडारी, प्रशांत माने, दिलीप भंडारी, प्रभू राज हिरेमठ, गणेश रणसिंग, सुधाकर देशमाने, मधुकर भोसले, वसंत लाड आणि अनिल भांडवलकर यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

loading image
go to top