
निरगुडसर (पुणे) : शेतकऱ्याच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच दुधाला प्रतिलिटर ३२ रुपये असा उच्चांकी दर मिळू लागला होता. त्यामुळे अनेक तरुण शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाकडे कल वाढला होता. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरु केला. परंतु, कोरोनाच्या संकटात दुधाचे दर १८ ते २० रुपयांपर्यंत कोसळले आणि तोंडातला सोन्याचा घास हिरावला.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, दुधाचे दर दूध भुकटी व इतर उत्पादनावर जास्तीत जास्त अवलंबुन आहे. दूध पॅकिंगचे दर कधीच कमी होत नाही, परंतु पावडरीच्या दरात होत असलेल्या चढउतारामुळे दूध दर कमी जास्त होतो. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत विविध दुकाने बंद आहेत. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थाची विक्री कमी होते. त्यामुळे दुधाच्या दराला फटका बसला आहे. राज्यात दररोज एक कोटी १९ लाख दुध संकलन आहे. त्यापैकी ६७ लाख दूध हे पॅकिंगसाठी जाते, तर व ५२ लाख लिटर दूध भुकटी व अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी जाते. त्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध २५ रुपये दराने राज्य सरकार राज्यातील दूध संघाकडून खरेदी करत आहे. परंतु, शेतकऱ्यांना सध्या तो दर मिळत नाही.
पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय
निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील उदय हांडे या युवा शेतकऱ्याने बँकेकडुन २० लाख रुपये कर्ज काढुन आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरु केला. त्यामध्ये काही गायी परराज्यातून आणल्या. अशा एकुण २६ गायी खरदी केल्या. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, चाऱ्यासाठी कुट्टीमशीन खरेदी करुन व्यवसाय सुरु केला. ३२ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. परंतु, कोरोनामुळे दर कोसळला आणि व्यवसायाला घरघर लागली. २६ गायींपैकी २१ गायी विकल्या. त्यामध्ये ३ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. अशा प्रकारे व्यवसायाला काडीमोड करण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.
अनुदान थेट शेतकऱ्याला मिळावे
दुधाचे दर कोसळले असले, तरी शेतकऱ्यांचा भांडवली खर्च काही कमी होईना. पशूखाद्याचे दरही जवळपास जैसथे आहे. मजुरीचे दर वाढले आहेत. हिरव्या चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यातुलनेत दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारकडून प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्याला मिळणे गरजेचे आहे. खाजगी संस्था, इतर संस्था २५ रुपये व ५ रुपये अनुदानाप्रमाणे एकुण ३० रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.
सरकार 10 लाख लिटर अतिरिक्त दूध प्रतिलिटर 25 रुपये दराने राज्यातील विविध संघाकडून खरेदी करत आहे. परंतु तो दर शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तोटा सहन करावा लागतो. जवळपास तीन महिन्यांत 150 कोटी रुपयांची मलई राज्यातील दूध संघानी खाल्ली, दूध संघवाले मालामाल तर शेतकरी कंगाल झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला मिळावे.
- प्रभाकर बांगर, आंबेगाव तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.