शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रांमार्फत मिळणार डिजिटलद्वारे मार्गदर्शन

kvk
kvk

नारायणगाव (पुणे) : महाराष्ट्र आणि गोवा कार्यक्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्रांमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल व्यासपीठाचा वापर करण्यात येणार आहे. 

कृषी तंत्रज्ञान अवलोकन संशोधन संस्था (अटारी) झोन ८, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ५१ कृषी विज्ञान केंद्रांची (केव्हीके) राज्यस्तरीय ऑनलाईन वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी उपमहासंचालक भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उपमहासंचालक (कृषी विस्तार) डॉ. अशोक कुमार सिंग यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कृषी विज्ञान केंद्रांचे अध्यक्ष अनील मेहेर यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
  
या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल व्यासपीठाचा वापर करणे, आगामी खरिप हंगाम नियोजनाबरोबर शेतीवर आधारित दुय्यम व्यवसाय,  फुलशेती,  दुग्धव्यवसाय, एकात्मिक शेती पद्धती मॉडेल, विपणन प्रणाली आणि मागणी व पुरवठा साखळीच्य व्यवस्थापनावर भर देणे,घरगुती पातळीवर विविध भाजीपाला व अन्न-धान्य साठवणूक व्यवस्था निर्मितीबाबत जनजागृती करणे, उत्पन्न दुप्पट वाढीसाठी केव्हीकेनी आदर्श मॉडेल गाव विकसित करणे, हवामान बदलातील परिस्थितीनुसार शेती तंत्रज्ञानावर आधारित माहिती प्रसारित करणे, माती परिक्षण करण्यासाठी शेतकऱ्याना प्रोत्साहित करणे, शेतमाल प्रतवारी, साठवणूक व विपणन व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करणे, लागवडी खर्चात कपात करण्यासाठी तंत्रज्ञानाचे व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मिडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोचविणे, एकात्मिक कीड नियंत्रण, कोविड-१९ संकट परिस्थितीचा सामना करण्यासाठी आकस्मिक नियोजन करण्याचे आदीबाबत यावेळी उपस्थित मान्यवरांनी चर्चा केली.

या ऑनलाईन कार्यशाळेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, जोधपूर  अटारीचे संचालक डॉ. एस के सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. एस. आर. गडाख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवसरकार, अटारी पुणे शास्रज्ञ डॉ. अमोल भालेराव, डॉ. अंकुश कांबळे व ५१ कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्रज्ञ सहभागी झाले होते. राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com