Fashion : ऑफ व्हाइट साडीतला जेनेलियाचा गजरा आणि नथीचा नखरा पाहीलात का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

genelia dsouza

Fashion : ऑफ व्हाइट साडीतला जेनेलियाचा गजरा आणि नथीचा नखरा पाहीलात का?

पुणे : साऊथ इंडियन असूनही मराठी कल्चर कसे जपावे हे बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा- देशमुख हिच्याकडून शिकावे.अभिनेता रितेश देशमुखशी लग्न झाल्यानंतर एका वेगळ्या कल्चरमधून जेनेलिया मराठी कल्चरमध्ये आली. कोणताही अवॉर्ड शो असो किंवा टीव्ही शो जेनेलिया नेहमीच मराठी कल्चर फॉलो करताना दिसते. सोशल मिडीयावरही ती ऍक्टीव्ह असते. विलासराव देशमुखांच्या लातूरमधील घरी जेनेलिया मुलांसोबत जाते. तिथल्या शेतात, घरातील तिचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. जेनेलिया अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मिडीयावर ती ऍक्टीव्ह असते.

वयाची तिशी ओलांडली असली तरी फॅशन सेन्समुळे ती आजही चर्चेत येते. तिला ग्लॅमरस लुकमध्ये पाहून ती दोन मोठ्या मुलांची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. जेनेलियाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिने ऑफ-व्हाइट कलरची साडी नेसली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. जेनेलियाची ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर जेजे वलाया यांच्या कलेक्शनमधून निवडली आहे. जेनेलियाने परिधान केलेली साडी सिल्क फॅब्रिकपासून बनलेली आहे. त्यामुळे या साडीला रिच लुक आला आहे.

ही साडी लाइटवेट असून ती कॅरी करणं अगदी सहज शक्य आहे. या साडीवर पुढील बाजूस हेवी वर्क आहे. त्यामुळे साडीला अधिकच क्लासी लुक आला आहे. साडीच्या बॉर्डरवर केलेले कलमकारी नाजूक काम साडीच्या सौंदर्यात अधिकच भर घालते. या साडीवर जेनेलियाने मॅचिंगचा डिझायनर ब्लाऊज घातला आहे. या ट्रॅडीशनल लुकवर जेनेलियाने मॅचिंग इअररींग्स, बांगड्या आणि नथ घातली आहे. केसांचा बन बांधून तिने त्यामध्ये गजराही घातला आहे.