एमसीक्यू परीक्षा पद्धतीविरोधात पुणे विद्यापीठात उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतिम वर्षाची परीक्षा "मल्टिपल चॉइस कोश्चन' (एमसीक्यू) पद्धतीने घेणार
असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोमनाथ लोहार यांनी गुरूवार (ता.१०) पासून उपोषण सुरू केले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतिम वर्षाची परीक्षा "मल्टिपल चॉइस कोश्चन' (एमसीक्यू) पद्धतीने घेणार
असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोमनाथ लोहार यांनी गुरूवार (ता.१०) पासून उपोषण सुरू केले आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करून इतर राज्यांप्रमाणे घरून परिषद देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाने ९ सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक रद्द करावे, एमसीक्यू पद्धतीने परिक्षा न घेता मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल, वाराणसी विधापीठ यांच्या धर्तीवर होम असाइनमेंट बेस परीक्षा घ्यावी. मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना प्रश्नसंच देऊन परीक्षेचा तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा. तसेच विद्यार्थी हिताचा आणि त्यांच्या भविष्याचा अजिबात विचार न करता स्वतः चा मनमानी कारभार करु पाहणारे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांना या पदावरून दूर करावे अशा मागण्यांचे निवेदन  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना लोहार यांनी दिले आहे. रयत विद्यार्थी परिषदेचे ओमकार भोईर, हर्षद बनसोडे, अजय चव्हाण आदींनी लोहार यांची विद्यीपीठात भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोहार म्हणाले, "विद्यार्थ्यांची परीक्षा सोप्या  पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठाकडे केली होती. तरीही विद्यापीठाने नऊ सप्टेंबर रोजी एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घेणार असल्याचे परिपत्रक काढले. हे परिपत्रक रद्द करून विद्यार्थ्यांची होम असाइन्मेंट बेस परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fast at Pune University against MCQ examination system