पुणे : भरधाव दूध टेम्पोची ट्रकला धडक, टेम्पोचालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पुणे : दूध घेऊन जाणाऱ्या भरधाव टेम्पोची रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाचा मृत्यु झाला. ही घटना बुधवारी पहाटे सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील स्मशानभुमीजवळ घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सतिश निवृत्ती पवार (वय 42, रा. हडपसर, मुळ रा. पवारवाडी, तरडोली, बारामती) असे अपघातामध्ये मृत्यु झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी शैलेश नेहेरकर यांनी फिर्याद दिली.

भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी; केरळमध्ये आढळला रुग्ण

पोलिस उपनिरीक्षक व्हि.जे.महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे कोल्हापुर येथून दूधाचा टेम्पो घेऊन मंगळवारी मध्यरात्री पुण्याला निघाले होते. ते पहाटे पाच वाण्याच्या सुमारास पुण्यात पोचले. दरम्यान, पहाटेची वेळ असल्याने त्यांच्या ताब्यातील टेम्पो भरधाव जात असताना मुंबई-बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील स्मशानभुमीजवळ थांबलेल्या एका ट्रकला टेम्पोची जोरदार धडक बसली. पवार हे टेम्पोमध्ये एकटेच होते. त्यांना अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fast run milk tempo hit by truck death of tempo driver in Pune