

One Killed in Container-Truck Collision on Pune–Nashik Road
sakal
मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकलहरे (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. ३१ मार्च) रात्री आयशर कंटेनरने मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश शशिकांत टपाल (वय ३५, रा. टेमगिरी, संगमनेर) असे मृताचे नाव आहे.