

Pune Accident
-अमर परदेशी
पाटस: पुणे सोलापूर महामार्गावर पाटस (ता. दौंड) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील बारामतीफाटा येथे शनिवारी (ता.३) सायंकाळी सव्वा सहा वाजता ही घटना घडली. गजानन मुकुंद शेलार (वय 59) रा. पाटस- तामखडा ता. दौंड, जि. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.