
पुणे : वाहनांच्या व नागरिकांच्या गर्दीने कायमच गजबजलेल्या टिळक रस्त्यावर एका व्यावसायिकावर तिघांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता घडली. ही घटना व्यावसायिकावर वाद किंवा पुर्ववैमनस्यातून घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच संशयित आरोपींचा पोलिसांकडून तत्काळ शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
उमेश नांगरे (वय 43, रा. सिंहगड रस्ता) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद धुमाळ (वय 40, रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धुमाळ व नांगरे हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. धुमाळ हे खासगी बॅंकेचे वसुली अधिकारी व व्यावसायिक आहेत. नांगरे हे पुर्वी सदाशिव पेठेत राहात होते. त्यामुळे शुक्रवारी ते त्यांच्या मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी एकत्र आले होते. जेवण व मित्रांबरोबर गप्पा झाल्यानंतर रात्री साडे दहा वाजता त्यांनी त्यांचा मित्र व फिर्यादी धुमाळ यांना महाराष्ट्र मंडळासमोर लावलेल्या त्यांच्या कारपर्यंत सोडण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी त्यांना त्यांच्या गाडीवरुन कारपर्यंत सोडविले. ते कारचा दरवाजा उघडत असताना तेथेच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील लोखंडी सळई व तीक्ष्ण हत्याराने नांगरे यांच्यावर हल्ला केला. नांगरे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादी हे पुन्हा त्यांच्या दिशेने धावले. त्यावेळी एका हल्लेखोराने त्यांना तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादी यांनी तेथून जात आपल्या मित्रांना बोलावून आणले. तोपर्यंत हल्लेखोर तेथून पळून गेले होते. तेवढ्यात फिर्यादी व त्यांचे मित्र तेथे धावले. त्यांनी नांगरे यांना तेथून तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केले.
Video : पुणेकरांनो, पावसाळ्यातही चाखता येणार रससशीत रत्ना हापूस आंब्याची गोडी
दरम्यान, या हल्ल्याचे मुळ कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र नांगरे यांनी भागीदारीमध्ये एक व्यावसाय सुरू केला होता. त्यावरुन त्याबाबत मागील पाच-सहा महिन्यांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला व्यावसायिक वाद किंवा पुर्व वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता कळकसर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एम. खानविलकर तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.