Video : पुणेकरांनो, पावसाळ्यातही चाखता येणार रससशीत रत्ना हापूस आंब्याची गोडी

प्रवीण डोके
Sunday, 6 September 2020

फळबाजारात रविवारी रत्ना हापुसची आवक झाली.  या आंब्याला प्रति डझनाला 1 हजार रुपये भाव मिळाला. हा आंबा चवीला गोड असून 300 ते 400 ग्रॅम इतके वजन आहे. या आंब्याची आवक वर्षातून दोन वेळा होते. यंदा प्रथमच आवक झाली आहे.

मार्केट यार्ड (पुणे) : फळबाजारात रविवारी रत्ना हापुसची आवक झाली.  या आंब्याला प्रति डझनाला 1 हजार रुपये भाव मिळाला. हा आंबा चवीला गोड असून 300 ते 400 ग्रॅम इतके वजन आहे. या आंब्याची आवक वर्षातून दोन वेळा होते. यंदा प्रथमच आवक झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील शेतकरी रमेश खोत यांच्या बागेतून रत्ना हापुसची आवक झाली. मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी बापू भोसले यांच्या गाळ्यावर रविवारी 160 डझन आंब्याची आवक झाली. पुणे शहर, उपनगरातील फळविक्रेत्यांनी आंब्याची खरेदी केली.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

रत्ना हापूस आंब्याला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. आंब्याची गुणवत्ता पाहूनच ग्राहकांनी आंब्याची खरेदी केली. साधारणतः अजून 20 दिवस रत्ना आंब्याची आवक सुरू राहील. तसेच भावही चांगले मिळती असल्याचे व्यापारी बापू भोसले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratna Hapus has come for sale in the market yard