

Accident
sakal
कुरुळी - चाकण- तळेगाव महामार्गावर महाळुंगे (ता. खेड) येथे गुरुवारी (ता. १८) सकाळी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला टेम्पोची जोरदार धडक बसली. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिसांनी दिली.