
Pune News: कुत्र्यावरून दोन माणसांमध्ये जीवघेणी हाणामारी; स्थळ पुणे
पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणेच पुण्यात अनेक वेगवेगळ्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वी एका चोराने कुत्रं पळवून नेल्याची घटना घडली होती. तर आताची घटना कुत्र्यांच्या बाबतीतच आहे. भांडण कुत्रे करत असतानाच माणसांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुत्र्यांचे भांडण सुरू असताना हे भांडण न सोडवल्याने दोन जणांमध्ये हाणामारी सुरू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीत एकाकडून कुत्र्याच्या बेल्टने दुसऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Pune MNS: 'रुपाली ठोंबरेंचं काम दाखवा अन् बक्षीस मिळवा'; मनसेची अनोखी मोहीम
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पुणे विद्यापीठात सेवक चाळ या ठिकाणी शेजारी राहतात. शनिवारी दुपारी फिर्यादी यांचा कुत्रा आणि आरोपी यांचा कुत्रा या दोघात भांडण सुरू झाले. तेव्हा आरोपीने फिर्यादीला कुत्र्यातील भांडण सोडवण्यासाठी सांगितले. मात्र मी मध्ये पडणार नाही अशी भूमिका फिर्यादी यांनी मांडली आणि तिथून निघून गेल्या. आरोपीने मागून जाऊन हातातील कुत्र्याच्या बेल्टने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
हेही वाचा: Pune Crime: 'पुणे मेट्रो'चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक