
Pune MNS: 'रुपाली ठोंबरेंचं काम दाखवा अन् बक्षीस मिळवा'; मनसेची अनोखी मोहीम
पुण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेतून नाराजीचे सूर दिसून येत होते. अशातच इतर पक्ष एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसून येतात. अशातच मनसे पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे घडयाळ हाती बांधलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी प्रश्न विचारत टीका केली आहे.
याबत मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ट्विटरवर पोस्ट लिहत टीका केली आहे. 'ताईला स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी राज साहेबांच्या वर टीका करण्यापलीकडे कुठलंही काम राहिलं नाही अशा शब्दात साईनाथ बाबर यांची खोचक टिका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी रूपाली ठोंबरे यांना काम दाखवा आणि शंभर रुपये बक्षीस मिळवा असंही म्हंटलं आहे. ताईने गेल्या वर्षभरात केलेले कुठलेही सामाजिक काम दाखवा आणि शंभर रुपये मिळवा अशी पोस्ट लिहून टीका केली आहे.
हेही वाचा: MNS Pune : वसंत मोरेंना पुन्हा धक्का! मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी
काल रूपाली पाटील ठोंबरे यांनी महामोर्चाला जाण्याआधी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज्यपालांच्या विधानावर ते गप्प का बसले? मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा सणसणीत टोला रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता अप्रत्यक्षपणे लगावला होता.
हेही वाचा: MNS Pune : मनसेला धक्का; वसंत मोरेंचे कट्टर समर्थक जाणार शिंदे गटात!