राजेगाव - कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील वडील व लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला आहे. ही घटना रविवारी (ता. २) सायंकाळी घडली..खंडू नारायण बनसुडे (वय ३५) व रुद्र खंडू बनसुडे (वय ६, रा. पळसदेव, ता. इंदापूर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष नारायण बनसुडे (पळसदेव, ता. इंदापूर) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..खंडू बनसुडे हे त्यांचा मुलगा रुद्र याला घेऊन दुचाकीवरून (क्र. एमएच ४२ एटी ९२२) पुण्याहून पळसदेवकडे चालले होते. ते कुरकुंभ हद्दीतील उड्डाणपुलावर आले. त्यावेळी चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कंटेनरने बनसुडे यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.या अपघातात दुचाकीवरील दोघांना डोक्याला, हाताला, पायाला, गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत..खंडू बनसुडे हे शेतकरी होते. शून्यातून सुरुवात करून काबाडकष्ट करून शेती पिकवली होती. त्यांना दोन मुले होती. रुद्र मोठा होता. दरम्यान, खंडू यांची आई मालन (वय ६०) यांना घटनेमुळे धक्का बसला. बीपी वाढल्याने त्यांना इंदापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पिता- पुत्रांच्या आकस्मिक मृत्यूने सगळीकडे शोककळा पसरली होती..रुद्रच्या आयुष्यातील शेवटचीच सुट्टीरुद्र हा दिवाळी सुटीसाठी हडपसर (पुणे) येथे मावशीकडे होता. सुट्टी संपल्याने सोमवारी (ता. ३) शाळेत जायचे होते. त्यामुळे त्याचे वडील रविवारी रुद्रला घेऊन घराकडे पळसदेवला चालले होते. मात्र, त्यांचा प्रवासातच अपघात झाला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.