esakal | धक्कादायक, पूर्व हवेलीतील सहा वर्षीय मुलासह वडील कोरोनाबाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तेरावर पोचली आहे. 

धक्कादायक, पूर्व हवेलीतील सहा वर्षीय मुलासह वडील कोरोनाबाधित 

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील एका पस्तीस वर्षीय कामगारासह त्याचा सहा वर्षीय मुलगा कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ते पूर्व हवेलीमधील आळंदी म्हातोबाची येथील रहिवासी आहे. त्यांच्यामुळे पूर्व हवेलीमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तेरावर पोचली आहे. 

सासवडकरांचे टेन्शन वाढले, शहराजवळील गावात कोरोनाचा रुग्ण  

कोरोनाबाधित कामगार व त्यांच्या मुलावर हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या घरातील सहा जणांना घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहमूद लकडे यांनी दिली आहे. 

बारामतीत एसटीचे चाक लॉकडाउनमुळे रुतले, 15 कोटींचे नुकसान 

हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमधील आठ कामगारांना बुधवारी (ता. 20) कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. त्यामुळे कंपनी प्रशासनाने केलेल्या टेस्टमध्ये मांजरी बुद्रूक हद्दीतील एक व आळंदी म्हातोबाची येथील एक, असे दोन कामगार कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, आळंदी म्हातोबाची येथील कामगार कोरोनाबाधित असल्याचे लक्षात येताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीने कामगारांच्या घरातील जवळच्या नातेवाइकांच्या कोरोना टेस्ट करून घेतल्या. यात संबंधित कामगाराचा सहा वर्षीय मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शनिवारी (ता. 23) दुपारी आढळून आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. मेहमूद लकडे म्हणाले, ""आळंदी म्हातोबाची येथील कोरोनाबाधित कामगार व त्याच्या मुलावर सध्या हडपसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा वर्षीय मुलाचा सांभाळ करण्यासाठी मुलाच्या आईलाही मुलाबरोबरच ठेवले आहे. संबंधित कामगारांच्या घरातील सहा जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी आठही जणांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

loading image
go to top